घटस्फोटानंतरही आमिरचं किरण रावशी आहे खास नातं, म्हणाला “ती नेहमीच माझ्या…”


बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या ‘लाल सिंह चड्ढा’ या त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिर त्याच्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. लवकरच तो करीना कपूर खानसोबत ‘कॉफी विथ करण ७’च्या आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहे. या चॅटशोमध्ये आमिरनं त्याचं खासगी आयुष्य, घटस्फोट आणि पूर्वश्रमीच्या पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्याबाबत बरेच खुलासे केले आहेत.

करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण ७’मध्ये आमिर खान पुन्हा एकदा त्याचं कुटुंब, पूर्वश्रमीच्या दोन्ही पत्नी आणि त्यांच्यासोबत असलेले त्याचे नातेसंबंध यावर बोलताना दिसणार आहे. करण जोहरशी दिलखुलास गप्पा मारताना आमिर खाननं हे स्पष्ट केलं की, त्याचा नात्यात कोणताच वाईट किंवा कठोर क्षण नाही. पूर्वश्रमीच्या दोन्ही पत्नींसोबत त्याचं नातं कसं आहे यावर देखील त्यानं भाष्य केलं.

पूर्वश्रमीच्या पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्याबद्दल बोलताना आमिर खान म्हणाला, “त्या दोघींचाही मी मनापासून आदर करतो. आम्ही सगळे नेहमीच एका कुटुंबाप्रमाणे आहोत.” आमिर खानने पहिली पत्नी रीना दत्तापासून घटस्फोट घेतल्यानंतर किरण रावशी दुसरं लग्न केलं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी किरण आणि आमिरचा घटस्फोट झाला आहे.

आमिर खान पुढे म्हणाला, “अनेकांना वाटतं की माझे माझ्या पत्नीसोबत चांगले संबंध नाहीत. पण मी तुम्हाला खरं सांगू तर आम्ही सगळे आठवड्यातून एकामेकांना भेटतो. कामात कितीही व्यग्र असलो तरीही आम्ही हा नियम पाळतो. आजही आम्ही एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांवर प्रेम करतो आणि एकमेकांचा आदर करतो.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या