औरंगाबाद : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये प्रेमी युगुलाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद वेदांतनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली. सागर राजेश बावणे (२१ रा. एन ६ सिडको) आणि सपना खंदारे (२१, रा. मुकुंदवाडी) अशी मृतांची नावे असून हॉटेल ग्रेट पंजाबच्या रूम नंबर २०५ मध्ये दोघांचेही मृतदेह आढळल्याची माहिती वेदांतनगर पोलिसांनी दिली.
सागरचा मृतदेह गळफास घेतलेल्या तर सपना खोलीतील पलंगावर मृतावस्थेत पडलेल्या अवस्थेत आढळल्याने दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याची शक्यता नसून, सागरने सपनाला खून करून स्वतः गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटना दोन दिवसांपूर्वीच घडल्याचा अंदाज आहे. २९ जुलै रोजी सागरने हॉटेलची खोली बुक केली होती आणि ३१ जुलै रोजी सपना आली होती. तेव्हापासून दोघांच्या खोलीतून हॉटेलमधील कुठल्याही व्यक्ती, नोकराशी संपर्क साधण्यात आला न०हता, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली.
घटना स्थळी पोलिस निरिक्षक सचिन सानप, सहायक पोलिस निरिक्षक अनिल कंकाळ, पोलिस उपनिरिक्षक सुधाकर पाटील यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी पोहोचले. सहायक पोलिस आयुक्त थोरात यांनीही घटनास्थळी भेट दिली.
मृत सागर बीएच्या प्रथम वर्षात तर सपना बारावीत शिकत असल्याची माहिती मिळाली.
0 टिप्पण्या