फोटोच्या नादात कोसळला धबधब्यात: तीन दिवसांपासून शोध सुरू, मित्राने शूट केला व्हिडिओ


तामिळनाडूच्या कोडाईकनाल जिल्ह्यामध्ये काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली आहे. एका धबधब्यावर फोटो घेण्याच्या नादात २८ वर्षीय तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना या तरुणाच्या मित्राच्या कॅमेरात कैद झाली आहे. अजय पंडियन असे या तरुणाचे नाव असून तो अद्यापपर्यंत बेपत्ता आहे. अग्निशमन दलाच्या बचाव पथकाकडून या तरुणाचा शोध घेण्यात येत आहे.

४७ सेकंदांचा हा व्हिडिओ तीन ऑगस्टचा असून समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.  या व्हिडिओमध्ये बेपत्ता तरुण धबधब्याच्या अतिशय जवळ असलेल्या दगडांवर उभा राहून पोझ देताना दिसत आहे. धबधब्याची खोली आणि पाण्याचा खळखळाट नीट शूट व्हावा, यासाठी हा तरुण त्याच्या मित्राला हातवारे करताना देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे. याचदरम्यान दगडांवरून पाय घसरल्याने संतुलन राखण्याचा या तरुणाने प्रयत्न केला. मात्र, निसरड्या दगडांवरुन अवघ्या तीन ते चार सेकंदामध्ये तो धबधब्यात कोसळला आणि नाहीसा झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या