शनि अमावस्येला काळाचा घाला... तिघे ठार महामार्गावरील खड्डे बुजवताना मजुरांना कंटेनर ने चिरडले


कुकाणा :  नगर - औरंगाबाद मार्गावर खड्डे बुजवण्याचे काम करत असलेल्या मजुरांना  आज  भरधाव आलेल्या कंटेनरने चिरडवले याच कंटेनरने उभ्या टिप्परलाही  धडक दिली. शनिवारी  दुपारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात  कांगोणी  शिवारात झाला. रमेश भगवान माने (रा. बाभुळखेडे ता नेवासे) व ऋषिकेश संजय निकम (रा. सलाबतपुर  ता नेवासे), कंटेनरचालक  दादा खराडे  (रा. सातारा)  हे तिघे याअपघातात ठार झाले.  तर महेबुब शेख , संभाजी वायकर (रा बाभुळखेडे ता नेवासे)  हे  गंभीर जखमी झाले.                

कंटेनर क्रमांक एम. एच. 46 बी एफ 9155 हा भरधाव वेगाने नगरकडे जात असतांना खड्डे बुजवण्यासाठी  मटेरिअल  घेवुन उभ्या असलेल्या टिप्परला धडकत दुभाजकावर आदळला. मार्गावर खड्डे बुजवण्याचे काम करत असलेल्या मजुरांनाही कंटेनरने चिरडले.  

जखमी सर्व मजुरांना नेवासे फाट्यावर  खासगी रुग्णालयात हलविण्यात  आले.  डॉ  अविनाश काळे यांनी दोघांना मृत  घोषित केले. कंटेनर चालक खराडे हा गंभीर जखमी होत्या. उपचारादरम्यान त्याचीही प्राणज्योत मालवल्याचे डॉ विश्वास काळे यांनी सांगितले.   

  शनि अमावस्या असल्याने या मार्गावर दुचाकी चारचाकी वाहनांची गर्दी होती. अपघात घडल्यानंतर दुचाकीवरील  काही शनिभक्त तरुणांनी जखमींना मदत केली. रुग्णवाहिकेत उचलुन ठेवले व  रुग्णालयाकडे मार्गस्थ केले. कंटेनर चालक  केबीनमध्ये  पुर्णपणे गुंतलेला होता. त्यास बाहेर काढुन रुग्णवाहिकेत ठेवले. खड्डे बुजवण्याचे काम नगरच्या ठेकेदाराने घेतले असले तरी सर्व मजुर नेवासे तालुक्यातीलच होते. अपघातानंतर काही काळ खोळंबलेली वाहतुक शनिदर्शनाहुन परतणाऱ्या तरुणांमुळे सुरळीत  झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या