पूर्ववैमनस्यातून कोंढव्यात तरुणाचा खून


पुणे :
वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना कोंढव्यातील शिवनेरीनगर परिसरात घडली. महेश लक्ष्मण गुजर (वय २४, रा. शिवनेरीनगर, गल्ली क्रमांक २६, कोंढवा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी रात्री उशीरा कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुजर याचा खून पूर्ववैमनस्यातू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 गुजर बुधवारी रात्री दुचाकीवरुन घरी जात होता. त्या वेळी कोंढव्यातील भगवा चौक परिसरात दोघांनी त्याला अडवले आणि त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या गुजरला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

संशयित आरोपी राज पवार आणि त्याच्या साथीदारांनी गुजर याचा खून केल्याचा संशय आहे.  गुजर याच्या नात्यातील तरुणीची एका तरुणाशी मैत्री होती. पवार त्या तरुणाचा मित्र आहे. गुजर आणि तरुणात या कारणातून अनेकदा भांडणे झाली होती. वैमनस्यातून खून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या