पाटोदा : हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तर खाडे महाराजांना मारहाण करून लुटमार केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरुद्ध खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाल्याने खर्डा व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जामखेड तालुक्यातील 29 वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली. हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे महाराज (रा. सावरगाव घाट, हनुमान गड, ता. पाटोदा, जिल्हा बीड) यांनी जून 2022 ते 12 जुलै 2022 या दरम्यान फिर्यादी महिलेला सोन्याच्या दागिन्याचे तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून फिर्यादीच्या संमतीशिवाय बुवासाहेब खाडे महाराजांनी वेळोवेळी व बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले
त्यानुसार भा. द. वि. कलम 376(N), ५०६ प्रमाणे खाडे महाराजांवर गुन्हा दाखल झाल्याने खर्डा भागात मोठी खळबळ उडाली आहे. तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे हे नामांकित व आध्यात्मिक क्षेत्रातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जात आहे. अनेक राजकीय,सामाजिक क्षेत्रातील व सर्वसामन्य लोकांपर्यंत त्यांचा मोठा भक्तगण आहे, याप्रकरणी पीडित महिलेला न्याय मिळावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची परिसरात चवीने चर्चा रंगू लागली आहे.
बुवासाहेब खाडे महाराज यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी खर्डा जवळील मोहरी येथील घुगे वस्ती येथे सुरू असलेल्या महादेव मंदिराचे काम पाहण्यासाठी गेलो होते, त्याच दिवशी बाजीराव गीते यांच्या घरामध्ये पहाटे दीड ते पाच या वेळेत बाजीराव गीते, अरुण गीते, राहुल संपत गीते, भिवा गोपाळघरे, रामा गीते यांनी बाजीराव गीते यांच्या घरामध्ये बोलावून घेऊन आरोपी राहुल संपत गीते यांनी मोबाईल मधील फोटो दाखवून शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादीच्या दोन्ही कानशीलात मारले. त्यावेळी खडे महाराज खाली पडले. इतर आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, त्यावेळी राहुल गीते हा हातामध्ये दोरी घेऊन फिर्यादीचे तोंडाभोवती फिरून मनाला तुला फाशी देईल अशी धमकी दिली. बाजीराव गीते हा हातामध्ये लोखंडी पेरे घेऊन फिर्यादीच्या अंगावरील सोन्याच दागिने काढून दे, नाहीतर तुला जीवे मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करू, अशी धमकी देत फिर्यादीच्या ताब्यातील 13 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या असे बुवा साहेब खाडे महाराज यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानुसार खर्डा पोलीस स्टेशनला 327, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहे. या दोन्ही परस्पर विरोधी फिर्यादीमुळे गुन्हे दाखल झाल्याने भक्तगनात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संभाजी शेंडे पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत म्हस्के हे तपास करीत आहेत.
0 टिप्पण्या