करौलीच्या ‘एसबीआय’च्या शाखेतून ११ कोटींची नाणी गहाळ: सीबीआयकडून २५ ठिकाणी छापेमारी


राजस्थानच्या करौली शहरातील एसबीआय(SBI) शाखेतून ११ कोटी किमतीची नाणी गहाळ झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषन विभागाकडून(CBI) देशातील २५ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. दिल्ली, जयपूर, दौसा, करौली, सवाई माधोपूर, अल्वर, उदयपूर आणि भिलवाडासह इतर ठिकाणी १५ माजी बँक अधिकाऱ्यांशी संबंधित परिसरांमध्ये गुरुवारी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली.

राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने याप्रकरणी १३ एप्रिलला गुन्हा दाखल केला होता. करौलीच्या एसबीआय शाखेमध्ये रोख राखीव रकमेमध्ये ऑगस्ट २०२१ मध्ये तफावत आढळून आली होती. त्यानंतर झालेल्या प्राथमिक चौकशीत तब्बल ११ कोटी नाणी गायब असल्याचे उघडकीस आले होते.

एका खाजगी संस्थेकडून करौली बँकेतील पैशांची मोजणी करण्यात आली होती. त्यावेळी सुमारे दोन कोटी किमतीच्या तीन हजार नाण्यांच्या पिशव्या आरबीआयच्या(RBI) नाणे विभागात हस्तांतरीत करण्यात आल्या होत्या. दरम्यान, याप्रकरणी सध्या सीबीआयकडून कसून तपास सुरू असून ११ कोटींच्या नाण्यांचा शोध घेतला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या