आयसीसी रँकिंग- स्मृती मानधना टी-20 मध्ये कारकिर्दित पहिल्यांदाच दुसऱ्या स्थानावर .



 भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने आज जाहीर झालेल्या आयसीसी महिला खेळाडू रँकिंगमध्ये धमाल केली. स्मृतीने टी 20 मध्ये कारकिर्दित पहिल्यांदाच रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. याचबरोबर स्मृती वनडे रँकिंगमध्ये देखील तीन स्थानांनी वर सरकली आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात स्मृती मानधना दमदार फलंदाजी करत आहे. इंग्लंड विरूद्धच्या तीन टी 20 सामन्यात तिने एकूण 111 धावा केल्या आहेत. या कामगिरीचा फायदा तिला आयसीसी रँकिंगमध्ये झाला.

स्मृती मानधना यापूर्वी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर राहिली होती. तिने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 91 धावांची दमदार खेळी केली. या कामगिरीमुळे ती आता सातव्या स्थानावर पोहचली आहे. याचबरोबर टी 20 मध्ये स्मृतीचा पार्टनर सलामीवीर शेफाली वर्मा देखील टॉप टेनमध्ये सामील आहे. ती 666 गुण घेऊन सहाव्या स्थानावर आहे. वनडे रँकिंगमध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर देखील चार स्थानांची सुधारणा करत टॉप टेनमध्ये दाखल झाली आहे. ती सध्या 662 गुण घेऊन 9 व्या स्थानावर पोहचली आहे.

टी 20 अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये भारताची दिप्ती शर्मा देखील एक स्थान वर सरकली असून आता ती सहाव्या स्थानावर आहे. टी 20 रँकिंगमध्ये हरमनप्रीत कौर 14 व्या तर गोलंदाजीत वेगवान गोलंदाज रेणुका सिंह 10 व्या स्थानावर पोहचल्या आहेत. तर फिरकीपटू राधा यादव देखील चार स्थानांवर वर सरकत 14 व्या स्थानावर पोहचली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या