पुरामुळे तब्बल 38 हजार 787 शेतकर्‍यांचे नुकसान

 


पुरामुळे तब्बल 38 हजार 787 शेतकर्‍यांच्या 28 हजार 588 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

पुणे- 

पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे तब्बल 38 हजार 787 शेतकर्‍यांच्या 28 हजार 588 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

या शेतकर्‍यांना राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार 44 कोटी 38 लाख 90 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच जिल्हाधिकारी यांना वितरित केला जाणार आहे.

जून ते ऑगस्ट यादरम्यान पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. बाधित शेतकर्‍यांना केल्या जाणार्‍या आर्थिक मदतीमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. जून ते आत्तापर्यंत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांसह घरांची पडझड होऊन जीवितहनी झाली.

या नुकसानीची माहिती आपत्ती कक्षाला वेळेत होणे आवश्यक असते. मात्र, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील माहितीच मिळाली नाही. त्यामुळे अपुरीच माहिती सादर करण्यात आली. त्यामुळे विभागीय आयुक्तांचा प्रशासनावर वचक नसल्याचेच दिसून येत आहे.

जून ते ऑगस्ट जिल्हानिहाय माहिती
पुणे शेती क्षेत्र 2 हजार 248 हेक्टर
मागणी 3 कोटी 18 लाख 45 हजार
सातारा शेती क्षेत्र 199.87 हेक्टर
मागणी 28 लाख 85 हजार
सांगली क्षेत्र 81 हेक्टर
मागणी 28 लाख 58 हजार – जून-जुलै
सोलापूर क्षेत्र 25 हजार 999 हेक्टर
मागणी 40 कोटी 53 लाख
कोल्हापूर 60 हेक्टर
मागणी 9 लाख 93 हजार – जुलै.

पुणे विभागातील आकडेवारी
जिरायत क्षेत्र…
शेतकरी 34 हजार 664
क्षेत्र 25 हजार
247 हेक्टर
आर्थिक मदत 34 कोटी 34 लाख

सिंचनाखालील क्षेत्र
शेतकरी 2 हजार 555
क्षेत्र 2 हजार 205 हेक्टर
आर्थिक मदत 5 कोटी 95 लाख
बहुवार्षिक पिके
शेतकरी 1 हजार 568
क्षेत्र 1 हजार135 हेक्टर
आवश्यक मदत 4 कोटी 8 लाख
विभागात एकूण 28 हजार 588.58 हेक्टर क्षेत्र
शेतकरी 38 हजार 787
एकूण मागणी 44 कोटी 38 लाख 90 हजार

सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान
जून ते ऑगस्टमध्ये विभागात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 28 हजार शेतकर्‍यांचे 26 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यांच्यासाठी 40 कोटी 53 लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यातील 9 हजार 192 शेतकर्‍यांचे 2 हजार 248 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यांच्यासाठी 3 कोटी 18 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

सातारा जिल्ह्यातील 982 शेतकर्‍यांच्या 200 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यांच्यासाठी 29 कोटी रुपये मंजूर केले. सांगलीतील 185 शेतकर्‍यांचे 81 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यांच्या मदतीसाठी 28 कोटी 58 लाख तर कोल्हापूर जिल्ह्यातील 362 शेतकर्‍यांचे 60 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यांच्यासाठी 10 लाख रुपये मंजूर झाले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या