न भूतो न भविष्यते असा दसरा मेळावा भरवा -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

  दसरा मेळाव्याच्या वादात हायकोर्टाने शिवाजी पार्क ठाकरेंच्या शिवसेनेच्या पारड्यात टाकलं आहे. दरम्यान शिंदे गटाकडेही आता बीकेसीतल्या मैदानाचा पर्याय आहे. त्यामुळे आता इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. यासाठी आता शिंदे गट जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहे.

तर शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आता दंड थोपटले असून बंजारा समाजातील मते आपल्याकडे वळवण्यासाठी बंजारा समाजाचे आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शुक्रवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांना चांगलाच धक्का बसला आहे.

दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य केले ते म्हणाले "शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा होतो, तो म्हणजे शिवाजी पार्कवर, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी लाखो शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे.

राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी त्या-त्या जिल्ह्यातील प्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या