निरगुडसर फाटा ते जारकरवाडी फाटा रस्त्याची दयनीय अवस्थाजाकरवाडी :


       निरगुडसर (ता.आंबेगाव) जारकरवाडी येथील निरगुडसर फाटा ते जारकरवाडी फाटा या दोन किलोमीटर रस्त्याची सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असुन त्यात पावसाचे पाणी साचुन त्यास तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.त्यामुळे या रस्त्या वरुन प्रवास करताना प्रवाशांना खड्ड्यांमधून रस्ता शोधावा लागत आहे. संबधीत विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.
       या रस्त्यावरून रांजणगाव, शिरूर, शिक्रापुर, पाबळ, लोणी - धामणी आदी गावांसाठी प्रवास करणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.शिरूर -  रांजणगाव औद्यागिक वसाहतीकडे जाणाऱ्या वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा असल्याने बहुतांशी वाहन चालक याच मार्गाचा प्रवासासाठी अवलंब करत आहेत.त्यामुळे या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढु लागली आहे.मात्र या रस्त्यावरील खड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.

चौकट-
*दर्जाहीन दुरुस्ती*
या रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे बुजवण्याचे काम संबधीत विभागाने यापूर्वी केले आहे.परंतु खड्यांमध्ये फक्त मुरुम टाकुन बुजविले जात असल्यामुळे पुन्हा पावसामुळे हे खड्डे रौद्ररूप धारण करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या