पक्षाध्यक्ष नाही पण मुख्यमंत्री व्हायचंय. भाजपाचा काँग्रेसला टोला !!

 



नवी दिल्ली : काँग्रेसच्या एकाही नेत्याला अध्यक्ष व्हायचं नाहीए पण मुख्यमंत्री व्हायचंय, अशा शब्दांत राजस्थानातील काँग्रेसच्या सद्यस्थितीवरुन भाजपनं काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. अशोक गेहलोत समर्थकांनी नुकताच आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच शशी थरुर, दिग्विजय सिंह हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पण गेहलोत यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे. जर ते काँग्रेसचे अध्यक्ष बनले तर त्यांना राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा मात्र राजीनामा द्यावा लागणार आहे.

गेहलोत यांच्यानंतर नवा मुख्यमंत्री कोण असेल तर त्यासाठी सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा आहे. पण पायलट यांच्या नावाला गेहलोत समर्थक आमदारांचा विरोध आहे. तर पायलट मुख्यमंत्री झाले तर आम्ही आमदारकीचा राजीनामा देऊ असा इशारा काँग्रेसच्या ९२ आमदारांनी दिला आहे. त्यामुळं राजस्थानात नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधला आहे. दुसरीकडं राजस्थानात राजकीय पेचप्रसंग निर्माण झालेला असताना राहुल गांधी केरळमध्ये लहान मुलांसोबत फुटबॉल खेळण्यात व्यस्त असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यावरुन भाजप काँग्रेसला टार्गेट करण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या