सत्तारांच्या वक्तव्यामुळे भाजप- शिंदे गटात वाद पेटण्याची शक्यता !

 



माझ्या मतदारसंघात भाजपासोबत युती नको, असं विधान शिंदे गटातले मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. एकीकडे शिंदे गट भाजपासोबत युती करून त्यांच्या पाठिंब्याने सरकार चालवत आहे, मात्र दुसरीकडे त्याच गटातल्या मंत्र्याच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

ज्या ज्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघासारखी परिस्थिती असेल, तिथे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी विचार करावा. स्थानिक पातळीवर मैत्रीपूर्ण संबंध असायला हवेत. शेवटी निवडून आल्यावर आपण दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये सोबत राहू, जिल्ह्यात, महापालिकेत सोबत राहू पण स्थानिक लेव्हलवर जर भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे दोघेच असू तर त्या दोघांमध्ये जो निवडून येईल, तो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता असेल, असं शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

अब्दुल सत्तारांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, शिंदे गटातल्या आमदारांची नाराजी आता लपून राहिलेली नाही. प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये कालच जोरदार भांडणं झाल्याची बातमी येत होती. पण शिंदे गटाच्या एकनाथ शिंदेंसह सर्वांकडूनच हे वृत्त फेटाळण्यात येत आहे. त्यात आता सत्तारांच्या विधानाची भर पडल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या