महाविकास आघाडी काळात सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावेळी विरोधी पक्षाने जोरदार विरोध केला होता. राज्य या निर्णयावर आंदोलनं करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या निर्णयाची अंमलबजावणी आताचं सरकार करण्याच्या तयारीत दिसत आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता मतभेद पाहिला मिळत आहेत.
गुरूवारी शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं "की महाविकास आघाडीच्या काळात झालेला जनरल स्टोर्स किंवा मॉलमध्ये वाईनविक्रीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. तर त्यानंतर सुधीर मुनगंटीवार हे साम टिव्हीशी बोलताना म्हणाले की मॉल आणि मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय रद्द करण्यात येणार आहे.
या धोरणाचा ड्राफ्ट घेवून मी फडणवीसांना भेटून यावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली वाईन विक्रीचा निर्णय बरोबर नाही. असं मत त्यांनी व्यक्त केलं.
महाविकास आघाडी सरकारने 2022 च्या सुरूवातीच्या काळात किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासंदर्भात हा निर्णय अतिशय महत्त्वाचं असल्याचं सांगत महाविकासआघाडी सरकारने हा प्रस्ताव मांडला होता. मात्र, भाजप व धार्मिक संघटनांनी हा निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही असं सांगत विरोध केला होता.
0 टिप्पण्या