विसर्जन करताना विहिरीच्या पाण्यात बुडवून तरुणाचा मृत्यदौंड
: यवत पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वच गावातील गणेशोत्सव आणि विसर्जन शांततेत झाले परन्तु बोरीऐ नदी येथील घटना जीवाला घर करून गेली अशी व्यथित खंत  यवतचे पो नि नारायण पवार यांनी व्यक्त केली आहे.

यवत पोलीस ठाणे अंतर्गत बोरीऐ नदी येथे गणेश विसर्जन करताना येथील तरुण संकेत सहदेव म्हेत्रे वय 22 याचे विहिरीच्या पाण्यात बुडुन मृत्य झाला आहे,या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे,

बोरीऐ नदी येथे दुपारी आठ ते दहा तरुण गणेश विसर्जन करण्यास लिफट रस्त्यावरील विहिरीवर गणेश विसर्जन करण्यास गेले, गणेश विसर्जन करताना संकेत हा पाण्यात पडला, त्यास पोहता येत होते, वर येईल असे समजून अन्य पाहत होते, बराच वेळ होउन वर आल्याने अन्य तरुणांनी आरडा ओरड केली, जवळचे लोक धावून आले, काहींनी विहिरीत बुड्या मारून प्रयत्न केला, विहीर खोल व काठो काठ भरल्याने प्रयत्न फेल गेले, दरम्यान ही खबर गाव ,परिसर आणि यवत पोलीस यांचे पर्यंत पोचली, पो,नि,नारायण पवार ,सपोनि पडमराज गमपले व अन्य पोलीस घटना स्थळी धावले, तेथील परिस्थिती पाहून कोणीही पाण्यात उतरू नये, असे पवार यांनी सुचवले, त्यांनी पुणे येथील पाणबुडे यांचेशी सम्पर्क साधुन त्या ना पाचारण केलें, दरम्यान विहिरीवर सर्व गाव परिसर जमा झाला होता, सायंकाळी 6च्या दरम्यान दोघेजण पाणबुडे आले.त्यांनी पहिल्याच प्रयत्नात संकेतचा मृतदेह पाण्याबाहेर काढला, मृतदेह बघताच कुटुंबीय आप्तेष्ट यांनी आर्त टाहो फोडला,

नंतर संकेतच मृतदेह यवत येथे जिल्हा उप ग्रामीण रुग्णालयात  शवंचिकिस्ट साठी नेण्यात आला, रात्री उशिरा मृत देहावर अत्यसंस्कार करण्यात आले,

या घटनेने बोरीऐ नदी गाव आणि परिसरावर शोककळा पसरली, संकेत हा अविवाहित असून तो येथील पोलीस पाटील रोशनी संदीप म्हेत्रे यांचा पुतण्या होता,

सदर घटना माझे गावची आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या