ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर !


 राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका पार पडत असून १६ जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायतीचे निकाल आज लागणार आहेत. एकूण ६०८ ग्रामपंचायतीपैकी ६१ ग्रामपंचायतींवर सरपंचाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काल पार पडलेल्या मतदानासाठी ६७ टक्के मतदारांना मतदानाचा हक्क पार पाडला आहे. तसेच आज मतमोजणी पार पडत असून गुलाल उधळला जाणार आहे.

धुळ्यात भाजपचा झेंडा

धुळ्यात भाजपने ३३ पैकी ३२ ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा गुलाल

आंबेगावनंतर जुन्नर तालुक्यातही राष्ट्रवादीने आपला गुलाल उधळला असून आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीने तब्बल २९ जागांवर विजय मिळवला आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीवर भाजपचं कमळ, तर राष्ट्रवादीचे अतुल बेनके यांना जबर धक्का


चोपडा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचे निकाल हाती

जळगाव येथील चोपडा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे गट आघाडीवर असून प्रत्येकी ३ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना २ तर तीन ग्रामपंचायतींवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे चोपडा तालुक्यात भाजपला एकाही जागेवर विजय मिळवला आला नाही.

बुलढाण्यातील ७ पैकी ६ ग्रामपंचायतींचे निकाल हाती

बुलढाण्यातील ७ पैकी ६ ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला असून महाविकास आघाडी १, भाजपा १ आणि ५ जागांवर स्थानिक आघाडीने विजय मिळवला आहे.

शिंदे गटाचा ७६, तर आघाडीचा ६१ ग्रामपंचायतींवर झेंडा

आत्तापर्यंत शिंदे-भाजप गटाने ७६, काँग्रेसने २०, राष्ट्रवादीने ३१, आघाडीने ६१ ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे.

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचा झेंडा

आंबेगाव तालुक्यात २ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून २ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा भगवा फडकला असून बऱ्याच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी आघाडीवर आहे.आंबेगाव तालुक्यात १८ पैकी १४ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा.

नंदुरबार जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींचे निकाल हाती

  • भाजप - 19

  • शिंदे गट - 13

  • काँग्रेस - 4

  • राष्ट्रवादी - 0

  • अपक्ष - 5

जनतेतून सरपंच निवड होणार

सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार या निवडणुका पार पडत असून आज गुलाल उधळला जाणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या