प्रख्यात उद्योगपती गौतम अदानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर !
 मुंबई - ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यामुळे संपूर्ण शिवसेना अडचणीत आली आहे. आमदारांपाठोपाठ खासदार देखील शिंदे गटात गेल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचे आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी हे थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला दाखल झाले आहेत. 

दरम्यान उद्धव ठाकरे आणि गौतम अदानी यांच्या भेटीचे कारण अस्पष्ट आहे. मात्र या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. अदानी यांनी भाजपनेते आशिष शेलार यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे अदानी यांच्या राजकीय भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

आज संध्याकाळी मुंबईतील नेक्सो मैदानावर उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या गटप्रुमखांना संबोधित करणार आहेत. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. दरम्यान, दिल्लीतील पत्रकार परिषदेत शिंदे एखादी मोठी घोषणा करणार असल्याचेही सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्याशिवाय शिंदे यांच्या समवेत यावेळी काही महत्त्वाचे नेतेदेखील उपस्थित असणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या