शिवसेनेतील अतभूतपूर्व बंडानंतर उद्धव ठाकरे यांना अनेक पातळीवर संघर्षाचा सामना करावा लागला. दरम्यानच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सुरू केलेला ऐतिहासिक दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
विजयादशमीच्या दिवसी जो मेळावा होणार आहे. त्यासाठी आज आपल्याला विजय मिळाला आहे. न्यायदेवर जो आपला विश्वास होता. तो आज सार्थकी ठरला आहे. मी आज तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की, या दसरा मेळाव्याला उत्साहात या, शिस्तीने या, या आनंदाला गालबोट लागेल असं कोणतेही कृत होऊ देऊ नका. इतर काय करतील माहिती नाही. या मेळाव्याकडे जगाचे लक्ष लागले आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
0 टिप्पण्या