भारतीय क्रिकेट नियाम मंडळ (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) चा लिलाव हा त्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात घेण्याचे प्लॅनिंग करत आहे. 16 डिसेंबरला हा लिलाव होण्याची शक्यता आहे. ही तात्पूरती काढलेली तारीख आहे. याबाबत बीसीसीआय आयपीएल फ्रेंचायजींशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल.
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल 2023 चा लिलाव हा मिनी लिलाव असणार आहे. हा लिलाव कोठे होणार याचे ठिकाण अजून ठरलेले नाही. लीगच्या तारखा देखील निश्चित झालेल्या नाहीत. मात्र आयपीएल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यंदाची आयपीएल ही जुन्या होम अवे फॉरमॅटमध्ये होणार आहे.
आयपीएल 2023 च्या लिलावाची सॅलरी पर्स ही 95 कोटी असणार आहे. ही गेल्या वर्षीपेक्षा 5 कोटी जास्त असेल. जर फ्रेंचायजी एखाद्या खेळाडूला रिलीज किंवा ट्रेड करत असेल तर त्यांची पर्स अजूनही फुगणार आहे. आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि रविंद्र जडेजा यांच्यात दुरावा निर्माण झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे 2023 च्या मिनी लिलावात रविंद्र जडेजाला सीएसके रिलीज किंवा दुसऱ्या संघासोबत ट्रेड करू शकते.\
याचबरोबर गतवर्षीचा विजेता गुजरात टायटन्समधून देखील शुभमन गिल बाहेर पडणार असल्याचे संकेत फ्रेंचायजीने दिले होते. यावरूनच सीएसके आणि जीटी हे रविंद्र जडेजा आणि शुभमन गिल यांना ट्रेड करतील असाही अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या दोन्ही फ्रेंचायजीनी याबाबतचे वृत्त फेटाळले आहे. जडेजाला ट्रेड करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि अजून एक फ्रेंचायजी उत्सुक आहे. मात्र सीएसकेने याबाबतचेही वृत्त फेटाळले आहे.
जडेजा बरोबरच इतही काही खेळाडूंचे ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. यात गुजरात टायटन्सच्या राहुल तेवतिया आणि साई किशोरचा समावेश आहे. गुजरातकडे याबाबत अधिकृत विनंती आली होती. मात्र गुजरातने ती फेटाळून लावली आहे. असे असले तरी लिलावापर्यंत बऱ्याच गोष्टी घडून जातील.
0 टिप्पण्या