पटोलेंकडून राहुल गांधीची तुलना प्रभू श्रीरामाशी .



मुंबई :
 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची तुलना रामाशी केली आहे. ही तुलना करताना त्यांनी रामाच्या आयुष्यातील काही घटनांचा दाखला दिला आहे. या घटना राहुल गांधीच्या जीवनाशी मिळत्या जुळत्या असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

पटोले म्हणाले, भाजप आणि बाळासाहेब ठाकरे राहुल गांधींना राजकुमार म्हणायचे. त्याप्रमाणं राहुल गांधींकडे सर्वकाही राजपाठ असतानाही ते कन्याकुमारी-काश्मीर पदयात्रा करत आहेत. भगवान श्रीरामानंही पदयात्रा केली होती, शंकचार्यांनी पदयात्रा केली. आज राहुल गांधी या देशाच्या हितासाठी लढत आहेत. त्यामुळं मला गर्व आहे, मी अशा नेत्याचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, जो देशहितासाठी, जनतेसाठी आणि सर्व देशांसाठी यात्रा करत आहे.

राज्य सरकारचं जे वर्तन आहे ते योग्य नाही. एका मंत्र्याला सहा जिल्ह्याचं पालकमंत्री देण्यात येतं त्या जिल्ह्यांच्या जनतेचं काय होणार? ज्यांना लोकशाहीच मान्य नाही ते सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून भ्रष्ट्राचार आणि त्यामाध्यमातून भय आणि भूक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे भाजपचं षडयंत्र आहे ते लोकांच्या लक्षात येतंय. त्यामुळं हे सरकार डिसेंबरपर्यंत पडेल आणि राज्यात मध्यावती निवडणुका लागू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या