फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्पावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले ! मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा सगळ्यांचाच समाचार घेतला. भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असं ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकत्र आल्याने गेलेला वेदांता प्रकल्प परत येत असेल, तर चला मी तुमच्यासोबत येतो, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आज वेदांता गेला, त्यावर धादांत खोटं बोलत आहेत. लाज वाटली पाहिजे. कोणाची बाजू घेऊन कोणाशी भांडताय? आमच्यामुळे गेला की तुमच्यामुळे, अरे पण गेला ना, का नाही आणत? चला आम्ही तुमच्या सोबत राहतो, विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकत्र येऊ आणि गेलेला वेदांता परत आणू, चला मी तुमच्यासोबत येतो, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिंदेंना केलं.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या