भविष्यात कॉंग्रेस सोबत मैत्रीबद्दल खा. शरद पवारांचं महत्त्वपूर्ण विधान .



 राष्ट्रवादीचे सर्वोसर्वे शरद पवार यांनी 2024 च्या निवडणूका विरोधकांनी एकत्र येवून भाजप विरुध्द लढण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, शरद पवार यांनी पुन्हा २०२४ च्या निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. यावेळी काँग्रेससोबतच्या मैत्रीवरही भाष्य केलं आहे. 

शरद पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी, २०२४ मध्ये विरोधी पक्ष एकत्रित लढेल का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “एकत्रित काहीतरी करावं अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र अद्याप यासंबंधी काही नियोजन करण्यात आलेलं नाही.

नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांनी माझी भेट घेत मतं मांडली आहेत. मात्र अद्याप त्यांचं निर्णयात रुपांतर झालेलं नाही”. काँग्रेस यामध्ये अडसर ठरत नसल्याचंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

काँग्रेसला सोबत घेऊ नये असे काहींचे म्हणणं आहे. पण मला वाटतं, कोणी कोणाला सोबत घेऊ नये ही भूमिका घेऊ नये,” असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.

मात्र, नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार असल्याचं जाहीर केल्यासंबंधी विचारलं असता, आमच्या शुभेच्छा आहेत असं शरद पवार म्हणाले.

२०२४ च्या निवडणुकीत भाजपाला आव्हान देण्यासाठी विरोधकांची एकी करण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीशकुमार यांनी विरोधकांची एकजूट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या