'एमपीएससी' करणाऱ्या अजून एक विद्यार्थ्याचा आत्महत्येने बळी घेतला !




 पुणे : हजारो तरूण एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्यभरातून पुणे शहरात येतात दरम्यान अशाच एका 30 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी घडला. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून त्रिभुवन कावले (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, त्रिभुवन हा जालना जिल्ह्यातील असून जानेवारी 2021 पासून पुण्यात त्याच्या मित्रांसोबत राहत होता. आज दुपारच्या सुमारास त्याने राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यात नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले असून याला कोणी जबाबदार नाही असे चिठ्ठीत नमूद आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या