औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून नामांतराची मोहीम तीव्र झालीय. मागील काही दिवसांत औरंगाबादचं देखील नामांतर करण्यात आलं. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्याचा शिंदे सरकारनं निर्णय घेतला. आता जिल्ह्यातील महत्त्वाच्या किल्ल्याचंही नामांतर केलं जाणार आहे.
औरंगाबादमधील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या सुप्रसिद्ध दौलताबाद किल्ल्याचं नाव बदलण्यात येणार आहे. या किल्ल्याला पुन्हा एकदा देवगिरी किल्ला असं नाव देण्यात येईल, अशी घोषणा भाजप नेते आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलीय. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महारोजगार मेळाव्यात मंत्री लोढा बोलत होते.
दरम्यानच्या काळात देवगिरीचं नाव बदलून दौलताबाद करण्यात आलं होतं. आता पुढील हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनापर्यंत किल्ल्याचं नाव बदलून पुन्हा देवगिरी किल्ला असं नामकरण करण्यात येईल, अशी घोषणा मंगलप्रभात लोढा यांनी केली. आज सकाळीच लोढा यांनी किल्याला भेट दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या