थेट दिवाळीनंतर होणार सत्ता संघर्षाची सुनावणी !



 मुंबई : राज्यात शिंदे गट आणि शिवसेना यांच्याच खरी शिवसेना कोणती? यावरून कोर्टात वाद सुरू आहे. दरम्यान काल झालेल्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कामकाजाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. हा एक विषय निकाली निघाल्यानंतर आता याचिकेतील इतर मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टास सुरू असलेली सुनावणी लांबणीवर पडली आहे. यामध्ये अपात्रतेची याचिका आणि इतरही अनेक मुद्द्यावरील सुनावणी आता थेट दिवाळीनंतर होणार आहे.

शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाचा निकाल हा एक महिना लांबणीवर गेला आहे. आतापर्यंत या प्रकरणात घटनापीठाच्या स्थापनेनंतर अवघे दोन दिवस सुनावणी झाली आहे, त्यामुळे आता पुढील सुनावणी कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान पुढची तारीख एक नोव्हेंबर अशी देण्यात आली आहे. सध्या सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या चिन्हाबाबत निर्णय घेण्याची मुभा मिळाली आहे. मात्र सुप्रीम कोर्टातील सुनावणी एक महिना लांबणीवर पडल्याने शिवसेनेच्या चिंतेत काही प्रमाणात भर पडणार आहे. अद्यापही कोर्टासमोर सत्तासंघर्षाबाबत अनेक मुद्दे आहेत, ज्यावर निर्णय येणे बाकी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या