डॉलरच्या तुलनेत रुपया परत घसरला !

 



मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाचं पुन्हा एकदा ऐतिसाहिक अवमुल्यनं झालं आहे. २४ फेब्रुवारीनंतर रुपयाची ही दिवसभरातील सर्वात मोठी घसरण आहे. डॉलरच्या तुलनेत आजचा रुपयाचा दर हा ८०.८६ रुपयांवर घसरला, जो काल ७९.९७ रुपये इतका होता. 

काल ७९.९७ रुपयांवर बंद झालेल्या रुपयाच्या व्यवहाराला आजच्या दिवशी ८०.२८ रुपयांनी सुरुवात झाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेनं आपल्या रेपो रेटमध्ये ७५ बेसिस पॉईंटनं वाढ केल्यानं त्याचा परिणाम भारतीय रुपयावर पहायला मिळाला. यामुळं भविष्यात देखील रुपयाची किंमत वाढण्याची चिन्ह असून सन २०२४ पर्यंत हा ट्रेंड कायम राहिलं असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आशियातील बहुतेक देशांच्या चलनांचे व्यवहार हे डॉलरच्या तुलनेत घसरणीने सुरु झाले. चीनचा युआन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ७.१० वर पोहोचला.

"यूएस फेडरल रिझर्व्हच्या अलिकडील निर्णयांवरुन हे स्पष्ट होतंय की डॉलरच्या दरवाढीचं चक्र इतक्यात संपणार नाही. आम्हाला वाटतं की, देशांतर्गत आर्थिक शक्यतांमध्ये सुधारणा असूनही रुपया दबावाखाली राहण्याची शक्यता आहे. आगामी काळात रुपयाच्या हालचालींवर बोलताना ते म्हणाले, तांत्रिकदृष्ट्या डॉलर आणि रुपया या जोडीनं चढत्या त्रिकोणाच्या निर्मितीचं (अर्थशास्त्रातील एक संकल्पना) ब्रेकआउट पाहिलं ज्यामुळं रुपया 81.5 ते 82 झोनच्या दिशेने आणखी कमकुवत होऊ शकतो," असं मत स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना यांनी व्यक्त केलं आहे.

काही विदेशी मुद्रा व्यापार्‍यांनी म्हटलंय की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) स्थानिक चलनाची घसरण रोखण्यासाठी पाऊल उचललं असावं पण हा हस्तक्षेप फारसा आक्रमक नव्हता. रेलिगेअर ब्रोकिंगच्या कमोडिटी अँड करन्सी रिसर्चच्या उपाध्यक्षा सुगंधा सचदेवा यांनी सांगितले की, रशिया-युक्रेनमधील तणाव वाढण्याची चिन्हे आणि यूएस फेडरल रिझर्व्हने तिसऱ्यांदा 75 bps ची प्रचंड दरवाढ केल्यामुळं रुपया 80.61 च्या नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर गेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या