मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच त्यांच्या ट्विटर हँडलवरून पीएम नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या 'आभा हेल्थ कार्ड' काढण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. जयपुरमध्ये अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत आभा आयडी कार्डवर भर देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आभा आयडी हे एक प्रकारचं हेल्थ कार्ड असणार आहे.
केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी शनिवारी नोंदवलेल्या जबाबात आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत आभा आयडी बनवण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल इंडिया मिशनचा शुभारंभ झाला होता. या मिशनअंतर्गत विविध प्रकारच्या सेवांचं डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये शासनामार्फत आरोग्य विभागालाही डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभा हेल्थ कार्डबाबत नागरिकांना आवाहन केले आहे.
आयुष्मान भारत डिजिटल स्वास्थ्य मिशन अंतर्गत आतापर्यंत 21.9 कोटी आभा हेल्थ कार्ड आयडी बनवण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत 53,341 आरोग्य सेवा रजिस्टर्ड करण्यात आल्या आहेत. याशिवाय वैद्यकिय क्षेत्रातील 11,677 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचं देखील रजिस्ट्रेशन करण्यात आलंय. या योजनेअंतर्गत चाळीपेक्षा जास्त डिजिटल आरोग्य सेवांना जोडण्यात आलं आहे.
आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत शासनाने आभा आयडीची संकल्पना साकारली आहे. हे हेल्थ कार्ड भारत सरकाडून २०२१ मध्ये लाँच करण्यात आलं होतं. हे असं हेल्थ कार्ड असणार आहे ज्यामध्ये तुमच्या हेल्थचा संपूर्ण डाटा असणार आहे. हे कार्ड आभा हेल्थ कार्ड यूजर्सला त्यांच्या हेल्थ संबंधित माहिती देण्याची परवानगी देतं. या कार्डच्या मदतीने आभा हेल्थ कार्ड यूजर्स त्यांच्या हेल्थबाबतची माहिती हॉस्पिटल, क्लिनिक आणि बीमा कंपन्यांना डिजिटली शेअर करू शकतात.
आभा हेल्थ कार्ड यूजर्सला फ्री डिजिटली ॲक्सेस देतं. त्यामुळे तुम्ही आभा कार्ड यूजर झाल्यास डॉक्टरकडे जाताना तुम्हाला जुनी कागदपत्रे किंवा आजाराबाबत डॉक्टरला वेगळं सांगण्याची गरज भासणार नाही. या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला कोणता आजार आहे आणि तुमच्यावर कुठले उपचार करायचे आहेत हे डॉक्टरांना लगेच कळेल. आभा कार्ड तुम्हाला ऑप्ट इन आणि ऑप्ट आऊटची सुविधा देतं. याअंतर्गत यूजर्सना आरोग्यसंबंधित योजनांचा लाभ मिळतो. तसेच त्यामुळे कुठलाही व्यक्ती हे कार्ड बनवू शकतो.
आभा हेल्थ कार्डसाठी असे करा अप्लाय
कार्ड बनवण्यासाठी आधी ABHA वेबसाईटवर जावे.
त्यानंतर क्रिएट युवर आभा नाऊ वर क्लिक करा.
त्यानंतर जनरेट वाया आधारवर क्लिक करा
आता तुमच्या आधार नंबरवर वर्च्युअल आयडीवर नोंद करा.
खाली स्क्रोल करा आणि आय एम ॲग्री वर क्लिक करा. आणि खाली दिलेला कॅप्चा भरा
त्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
तुमच्या स्मार्टफोनवर आलेल्या ओटीपीची नोंद करा आणि सबमिटवर क्विक करा
आता तुमचा मोबाईल नंबर नोंदवत सबमिटवर क्विक करा
तुमच्याकडे आभा ॲड्रेस बनवण्याचं ऑप्शनही असेल जो एका ई-मेल आयडीसारखा असेल.
यानंतर तुम्ही तुमचं आभा कार्ड डाऊनलोड करू शकाल.
0 टिप्पण्या