शेअर मार्केट: सेन्सेक्स ५०९ नी घसरला.

 



शेअर बाजारात आज दिवसभरात घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारातील आजच्या व्यवहाराची सुरुवातही घसरणीसह झाली आहे. अमेरिकन शेअर बाजार आणि जागतिक शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला आहे. सेन्सेक्समध्ये 0.89 टक्क्यांची घसरण होऊन तो 56,598 अंकांवर स्थिरावला आहे. तर निफ्टीमध्ये 8.87 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,858 अंकावर पोहोचला.

सकाळच्या सत्रात शेअर बाजारातील व्यवहाराला आज सुरुवात झाल्यानंतर बाजारात विक्रीचा जोर दिसून आल्याने सेन्सेक्समध्ये 400 हून अधिक अंकांची पडझड झाली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 136.85 अंकांनी घसरत 16,870  अंकांवर खुला झाला होता. भारतीय शेअर बाजारातील घसरण सुरुच असून आजही गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या