Breaking News

कट कमिशन मुळे प्रकल्प महाराष्ट्रात न आल्याचा संशय

 प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी : आशिष शेलार



वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकरणावरून सध्या महाराष्ट्रात राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यासंदर्भात आता भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 'वेदांता प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्रात राजकारण केलं जात आहे. जी विधानं केली जात आहेत.

त्याने महाराष्ट्रातून जनतेमध्ये पेंग्विन सेनेमार्फत भ्रम पसरवले जात आहेत. म्हणून त्यावर स्पष्टीकरण देणं गरजेच आहे. काही वर्तमानपत्रांनी यावर अग्रलेख लिहिले आहेत. यात वेदांता प्रकल्प गुजरातला खेचून नेला-गेला तर याचा दुसरा अर्थ असा होतो की हा प्रकल्प महाराष्ट्रात होता.

मग हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरु कधी झाला? या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने सर्व परवानगी दिल्या होत्या का? सवलती दिल्या होत्या का? करारनामा कधी झाला? प्रकल्पासाठी जागा दिली होती का? असे अनेक सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

Post a Comment

0 Comments