फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यात आलं; ह्यावरून आदित्य ठाकरे शिंदे सरकारवर कडाडल्या



फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषद घेत, महाराष्ट्रात असणारी कंपनी गुजरातमध्ये का गेली? असे अनेक सवाल करत आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर घणघणात केला आहे. 

वेदांता व फॉक्सकॉनने आपला प्रकल्प महाराष्ट्रात उभारा असण्याचे जाहीर केले होते. याबाबत आम्ही वेदांताचे अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळीही त्यांनी महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या टीमने तळेगावची निवड देखील केली होती. मात्र आता हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे कळल्यानंतर मला धक्का बसला आहे.

एका महिन्यात असं काय घडलं की हा प्रकल्प गुजरातला गेला. एवढी मोठी गुंतवणुक महाराष्ट्रा बाहेर का गेली. असे सवाल उपस्थित करत आपलं सरकार हे खोकं सरकार आहे. अशा शब्दात आदित्या ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

करारातील ९० टक्के बाबी पूर्ण झाल्या होत्या. महाविकासआघाडी सरकार सत्तेत असताना हीच कंपनी राज्यात येत होती. सरकार बदलल्यानंतर हीच कंपनी का राज्याबाहेर गेली. पावणेदोनलाख कोटीचा हा उद्योग आहे. प्रकल्पामुळे राज्यात १ लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या. गुंतवणुकीसाठी मला हे सरकार पोषक वाटत नाही. उद्योग मत्र्यांनी जरा अभ्यास करुन उत्तर द्याव. अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

सध्या ते राजकारणात व्यस्त आहेत. थोडसं राजकारण बाजून ठेवून. जी आमच्यासोबत गद्दारी केली तीही थोडी बाजूला ठेवून. प्रशासन आणि कामावर लक्ष केंद्रीत केल तर महाराष्ट्र थोडं आवरु शकेल. मुख्यमंत्र्यांचा कुठेही अंकुश दिसत नाही. स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके असे हे सरकारा आहे. अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या