आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मराठा आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य. नाना पटोलेंकडून तीव्र विरोध.




 शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाले आहेत. या सरकारच्या काळात आरक्षण मिळेलच पण मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादीने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका घेतली असा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, असे विधान आक्षेपार्ह व बेजबाबदार आहे. तानाजी सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सावंत यांच्या विधानावर खुलासा करावा तसेच या बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय.

सावंत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर नाना पटोले यांनी टीका केलीय. मराठा आरक्षणाची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यातून विविध संघटना, राजकीय पक्ष यांचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारी पातळीवर व न्यायालयीन पातळीवरही हा लढा सुरु आहे. मविआ सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले, असल्याचेही पटोले यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या