सर्वाधिक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस ची सरशी, आकडे सांगून खा. शरद पवारांनी स्पष्ट केलं !

  राज्यात नुकताच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. त्यात भाजपकडून आम्ही मोठा विजय मिळवल्याचा दावा केला जात आहे.यासाठी भाजपकडून आकडेवारीही सादर करण्यात आली आहे. मात्र, शरद पवार यांनी जास्त जागा जिंकल्याचा आणि भाजप नंबर एक असल्याचं म्हणत भाजपचा हा दावा खोडून काढला आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं नंबर वन असल्याचा दावा पवारांनी केला आहे. आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला असून, यावेळी त्यांनी आकडेवारीच सादर केली आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण 608 जागा होत्या. त्यापैकी राष्ट्रवादीने 173, काँग्रेसने 84, भाजपने 168 आणि शिंदेगटाने 42 जागा जिंकल्याचे पवारांनी बोलताना सांगितले. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळाल्या याची आकडेवारी पवारांनी सांगितली नाही.

आम्हाला माहीत आहे आमच्या जागा किती आहेत. त्यामुळे आम्ही आकडेवारी सांगितली असे म्हणत इतर पक्षांना जर वाटत असेल त्यांच्या जागा जास्त आहेत तर, त्यांनी त्या आनंदात राहावं असा टोला पवारांनी भाजपचं नाव न घेता लगावला असून, पवारांच्या या टीकेला भाजप काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीत मविआने 277 जागांवर विजय मिळवला असून, शिंदे गट-भाजपला 210 जागा मिळाल्याचंही पवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या