खोक्यांचा हिशोब आत्ताच काढत नाही! , पैठणमधून मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल .

 


पैठण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी पैठण येथील सभेला संबोधित करताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांच्या शब्दसंग्रहात दोनच शब्द आहेत गद्दार आणि खोके अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. तसेच त्यांनी खोक्यांचा हिशोब आत्ताच काढत नाही असा सूचक इशाराही यावेळी बोलताना दिला.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोणाला काय वाटेल ते बोलू द्या, अजित दादा सकाळी सहा वाजता उठून काम करायचे असे काही लोकं म्हणाले. आदी दादा टीका करायचे आता ताई देखील सुरू झाल्या आहेत. टीका करणं त्यांचं काम आहे, विकासाचं काम करत राहणे हे आमचं काम आहे, आम्ही कामातून उत्तर देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


ताई म्हणाल्या की सहा वाजता उठून दादा काम करतात, ही चांगली गोष्ट आहे, पण मी ताईना माहिती देतो की हा एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांच काम करतो, आणि हे काम मी महाराष्ट्रासाठी करत राहाणार त्यामध्ये कोणताही खंड पडू देणार नाही अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर दिलं.


अनेक लोकांनी सांगितलं की खोके आणि गद्दार दोनचं शब्द यांच्या शब्दकोषात आहेत, २०१९ ला निवडणूका झाल्या तेव्हा बाळासाहेब आणि पंतप्रधान मोदी यांचा फोटो लावून मतं मागीतली. मत मिळाली ती युती म्हणून केलं. पण दुर्दैवानं करायला नको ते केलं. त्यामुळं मतदारांशी बैमानी कोणी केली आम्हाला गद्दार म्हण्याच्या आधी याचा विचार करावा, खोक्यांचा हिशोब मी आता काढत नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या