फिरत आहेत,” असं पवार यांनी म्हटलं.
याशिवाय राज्यामध्ये सध्या सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष या वादाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प तळेगावऐवजी गुजरातल्या गेल्याच्या प्रकरणावरुनही पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना शाब्दिक चिमटा काढला. “मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री या दोघांनीही मागच्या सरकारच्या काळात या प्रकल्पासंदर्भात निर्णय घेतला नाही असं म्हटलं. त्यासाठी उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे असं हे मंत्री म्हणाले. मात्र उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उदय सामंत मंत्री होते. ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री होते. हे दोघे ज्या मंत्रिमंडळात होते, त्या मंत्रीमंडळाने दुर्लक्ष केल्याचे आरोप त्यांनी केले आहेत. मला वाटतं हे शहाणपणाचं लक्षण नाही,” असा टोला शरद पवारांनी शिंदे आणि सामंत यांना लगावला.
0 टिप्पण्या