पासपोर्ट साठी आता पोस्टात करता येईल पोलिस क्लिअरन्ससाठी अर्ज; सरकारने घेतला निर्णय.



 पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) च्या मागणीत झालेल्या अनपेक्षित वाढ पाहाता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवार, 28 सप्टेंबर 2022 पासून भारतभरातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये (POPSKs) PCC सेवांसाठी अर्ज करण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परदेशात प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परराष्ट्र मंत्रालय सर्व पीओपीएस केंद्रांवर पीसीसी अर्जाची सुविधा उपलब्ध करून देईल. सरकारच्या या निर्णयामुळे केवळ नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांनाच नाही तर परदेशात शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांना, दीर्घकालीन व्हिसाची हवा असणारे आणि इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्यांनाही मदत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या