या स्टॉकचा मजबूत परतावा, अजून वाढीची दाट शक्यता.



 हिंदुस्तान एअरोनॉटिक्स (HAL) शेअर्समधील तेजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोमवारी बीएसईवर 7.44 टक्क्यांच्या मजबूत रॅलीसह हा शेअर 2,613.15 रुपयांवर बंद झाला आणि इंट्राडेमध्ये या शेअरने 2,639 रुपयांच्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. मोठ्या ऑर्डर्ससह मजबूत आउटलुकमुळे शेअरला सपोर्ट मिळत आहे. या वर्षात आतापर्यंत या शेअरने 112 टक्के मजबूत परतावा दिला आहे, तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स या कालावधीत केवळ 1.7 टक्के मजबूत झाला आहे.

एचएएलचा स्टॉक मार्च 2018 मध्ये शेअर बाजारात लॉन्च झाला होता. कंपनीने आयपीओद्वारे 1,215 रुपये प्रति शेअर दराने 4,113 कोटी रुपये उभारले होते. 24 मार्च 2020 रोजी स्टॉकने 448 रुपयांच्या विक्रमी नीचांकी पातळी गाठली होती, तेव्हापासून हा स्टॉक 475 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरने 83 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL) विमान, हेलिकॉप्टर, एअरोइंजिन, एव्हीओनिक्स, ऍक्सेसरीज आणि एअरोस्पेस स्ट्रक्चर्ससह अनेक उत्पादनांचे डिझाइन्स, डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरींग, रिपेअर, ओवरहॉल, अपग्रेड आणि सर्विसमध्ये गुंतलेली आहे. एअरोस्पेस क्षेत्रातील भारताच्या तिन्ही सैन्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीची निर्मिती करण्यात आली आहे.

कंपनीच्या तेजस विमान आणि लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरसारख्या उत्पादनांना भारताच्या सैन्यात तसेच मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे कंपनीला या उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा लष्करी आणि तिसरा सर्वात मोठा संरक्षण खर्च करणारा देश आहे. भारताच्या संरक्षण दलांनी केलेल्या खरेदीत सर्वाधिक वाटा HAL ला मिळेल अशी अपेक्षा आहे.

याशिवाय भारतीय संरक्षण दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एचएएल विशेष प्रकारची जेट विमाने बनवण्याचे काम करत आहे. अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर  आधारित मल्टीरोल ऍडव्हांस आणि लांब पल्ल्याच्या ड्रोनच्या विकासावरही काम करत आहे.

एचएएलच्या शेअर्सना 2860 रुपयांच्या टारगेटसह "बाय" रेटिंग दिले आहे. कंपनीकडे 82,200 कोटी रुपयांची ऑर्डर बुक आहे, जी आर्थिक वर्ष 2022 च्या कमाईच्या 3.3 पट आहे. कंपनीला विमान आणि हेलिकॉप्टरच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. याशिवाय मेंटेनन्स, रिपेअरिंग आणि ओव्हरहॉल सेगमेंटची ऑर्डर पाइपलाइनही खूप मजबूत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या