राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) देशभरातील कार्यालयावर छापे टाकल्यानंतर PFIच्या कार्यकर्त्यांनी देशभरातील अनेक ठिकाणी निदर्शने केली. काल पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनावेळी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यावरून आता राजकारण तापलेले असताना यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदेंनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी ट्वीट करत दिली आहे.
0 टिप्पण्या