अवघ्या तीन षटकात हा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट सामना संपला .

 



 एक आंतरराष्ट्रीय टी 20 सामना हा फक्त 3.2 षटकात म्हणजे 20 चेंडूत संपवण्यात आला. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सामना केनिया आणि कॅमेरून या दोन देशात खेळला गेला.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या कॅमेरूनने 14.2 षटकात सर्वबाद 48 धावाच केल्या. केनियाकडून यश तालातीने 8 धावात 3 विकेट घेतल्या. तर शेम नोचेने 10 धावा देत 3 विकेट घेतल्या. लुकाने 2 विकेट आणि गेरार्डने 1 विकेट घेत या दोघांना चांगली साथ दिली.

यानंतर कॅमेरूनच्या 49 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या केनियाने हे आव्हान फक्त 3.2 षटकात 1 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. रूशब पटेलने 14 तर सुखदीप सिंहने 10 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. नेहेमिआहने नाबाद 7 धावा करत सामना 3.2 षटकात संपवला.

जरी केनियाने कॅमेरूनचा तब्बल 100 चेंडू राखून पराभव केला असला तरी हे काही वर्ल्ड रेकॉर्ड नाही. ते या बाबतीत चौथ्या स्थानावर आहेत. यापूर्वी ऑस्ट्रियाने तुर्कस्तानवर 104 चेंडू आणि 10 वकेट्स राखून विजय मिळवला होता. यानंतर ओमानचा नंबर लागतो. त्यांनी फिलिपिन्सविरूद्ध 103 चेंडू आणि 9 विकेट्स राखून विजय मिळवला होता. तर लक्सेम्बर्गने देखील तुर्कस्तानचा 101 चेंडू आणि 8 विकेट्सनी पराभव केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या