गोवा मधील पॉलिटिकल ड्रामा नंतर 'आप'चा काँग्रेसवर ट्विटद्वारे हल्ला.



 नवी दिल्ली - सध्या राहुल गांधींच्या  नेतृत्त्वात काँग्रेसची  'भारत जोडो यात्रा' सुरू असतानाच गोव्यात  भाजपनं  काँग्रेसला जबर धक्का दिलाय. गोव्यात काँग्रेसला खिंडार पाडण्यात भाजपला यश आल असून काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. यावरून आम आदमी पक्षाने काँग्रेसवर खोचक टीका करत थेट पक्षाला श्रद्धांजली वाहिली आहे. 

आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "ऑपरेशन लोटस दिल्ली आणि पंजाबमध्ये अयशस्वी झाले, गोव्यात यशस्वी झाले... कारण जेव्हा तुम्ही काँग्रेसला मत देता, तेव्हा तुम्ही भाजपचा भावी आमदार निवडता." चढ्ढा यांनी थेट काँग्रेसला श्रद्धांजली वाहत, काँग्रेस संपली, म्हणत रेस्ट ईन पीस म्हटलं आहे."

गोव्यात 40 जागांपैकी 'आप'कडे दोन जागा आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ताधारी पक्ष असण्याव्यतिरिक्त, हे तिसरे राज्य आहे जिथे आपचे अस्तित्व आहे.

तत्पूर्वी केजरीवाल यांनी देखील गुजरात दौऱ्यात ‘काँग्रेस संपली’ असे म्हटले होते. केजरीवाल गुजरातमध्ये म्हणाले की, दोन महिने बाकी आहेत, भाजप जात आहे, आम आदमी पार्टी येत आहे. गुजरातमधील सर्व जागा आम्ही लढवू, असंही ते म्हणाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या