संघ जाहीर! जडेजा वर्ल्डकपला मुकला; बुमराह, पटेल परतले



येत्या 16 ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या  साठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच झाली. संघात जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल यांनी पुनरागमन केले आहे. तर जखमी जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आशिया कप झाल्यानंतरच संघ जवळपास 95 टक्के निश्चित झाला असल्याचे सांगितले होते. त्या प्रमाणे आशिया कपमध्ये खेळलेल्या संघात फारसा बदल नाही. भारतीय संघ 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.

भारताचा टी 20 वर्ल्डकपसाठीचा संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली,
सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँड बाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चाहर

बीसीसीआयने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठीच्या संघाबरोबरच मायदेशात येत्या 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या विरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी देखील संघ जाहीर केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ 

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ 

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.

भारतात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेदरम्यान हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार हे फिटनेस ट्रेनिंगसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या