भारतीय संघाला पहिल्या सामन्यात नऊ गडी राखत दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. या तीन सामन्यांच्या मालिकेत आपले अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे आवश्यक होते. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंड संघाने निर्धारित २० षटकात सहा गडी गमावून १४२ धावा केल्या. इंग्लंडच्या फ्रेया केम्पने ५१ धावा केल्या, तर मायिया बाउचियरने ३४ धावा केल्या. या दोघींशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. भारताकडून स्नेह राणाने तीन, तर रेणुका सिंग आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी एक बळी घेतला.
१४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, शेफाली वर्मा २० धावा करून बाद झाली, तोपर्यंत पॉवरप्लेमध्ये संघाच्या ५५ धावा झाल्या होत्या. भारताची दुसरी विकेट ७७ धावांवर पडली, जेव्हा दयालन हेमलता ९ धावांवर बाद झाली. यानंतर सलामीवीर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात भागीदारी होत संघाने १६.४ षटकांत लक्ष्य गाठले.
स्मृती मंधाना म्हणाली, “मागील सामन्यानंतर आम्हाला मजबूत पुनरागमन करून मालिकेत बरोबरी साधायची होती. खराब फटका खेळून कुठल्याही प्रकारचा दबाव संघावर येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न केले.”
0 टिप्पण्या