घोषित झालेलं नवीन संघ भारताला t20 विश्वविजेता बनवण्यात यशस्वी होणार ?

  बीसीसीआयने 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2022 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. आशिया चषक स्पर्धेत सहभागी झालेल्या बहुतांश खेळाडूंचा या संघात समावेश करण्यात आला आहे. भारत हा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे. आणि टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन भूमीवर 2022 चा टी-20 विश्वचषक जिंकण्याची मोठी संधी पण आहे.

ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना मदत करते. टीम इंडियाला 2022 चा टी-20 विश्वचषक जिंकायचा असेल, तर प्रत्येक सामन्यात बेस्ट प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवण्याची गरज आहे. टीम इंडियाच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनवर एक नजर टाकूया जी टी-20 वर्ल्ड कप 2022 ची ट्रॉफी जिंकू शकते.

टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा करतील. टीम इंडियाचा धाकड फलंदाज विराट कोहली जो आत्ता सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे, तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरवेल. सहाव्या क्रमांकावर यष्टीरक्षक फलंदाज आणि फिनिशर दिनेश कार्तिक फलंदाजीसाठी येईल. ऋषभ पंत संघात आहे, पण त्याला पहिल्याच सामन्यात प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान मिळू कठीण आहे. अक्षर पटेल ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल.

युझवेंद्र चहलची टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्पिनर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तो खेळताना दिसणार आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होणे जवळपास निश्चित आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या