राज्य सरकार दिवाळी सणासाठी शिधापत्रिका धारकांना शंभर रूपयांना किराणा सामान देणार आहे. राज्यभर किराणा किट दाखल झाले, असून किटचं वाटप ही सुरू झालं. या किटमध्ये चार वस्तू देण्यात येत आहेत. यामध्ये रवा, पाम तेल, चणाडाळ, आणि साखरेचा समावेश आहे. तर या किटच्या पुड्यावर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे.
तर या किटला आनंदाचा शिधा हे नाव देण्यात आलं आहे. मात्र या आनंदात देखील दलालांनी धंदा चालू केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मात्र पण 100 रुपयांच्या आनंदाच्या शिधासाठी 300 रुपये घेतले जात असल्याचं वास्तव समोर आले आहे. शिंदे सरकारने गाजावाजा करीत दिवाळीत सामान्यांना 100 रुपयाची रेशन किट 'आनंदाचा शिधा' स्वस्त धान्य दुकानातत उपब्लध करून दिला. मात्र 100 रुपयांच्या किटची ठाण्यात 300 रुपयांना विक्री केली जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात होत आहे. त्यामुळे आदिवासी भागातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दुकानदाराविरोधात शहापूर तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तहसीलदराकडे तक्रार करून कारवाईची मागणी केल्याने दिवाळी किटचा काळाबाजार उघडकीस आला आहे.
0 टिप्पण्या