पुढील 48 तासांत मान्सून देशातून निघून जाणार, हवामान विभागाची माहिती. राज्यातील नागरिकांची मान्सून पासून होणार सुटका होणार आहे. आज विदर्भाच्या अनेक भागातून मान्सून निघून गेला असल्याची माहिती मिळतेय. तर 24 तारखेच्या दरम्यान समुद्र किनारी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आणि उद्या कोकण भाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गडगडाटासह पाऊस होणार आहे. तर पुढील दोन दिवस पुणे, सातारा,कोल्हापूर या भागात ढगाळ वातावरण रहाणार असून मेगगर्जनेसह पाऊस होणार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या