राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सोनियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माफीही मागितली आणि अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.
गेहलोत सोनिया गांधींना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले, तेव्हा ते सर्व तयारीनिशी गेले होते, असं बोललं जातंय. गेहलोत यांनी एक चिठ्ठी तयार केली होती, जी सोनिया गांधींकडं सादर केली. त्यानंतर ते मीडियासमोर येत माफी मागितली. मल्याळ मनोरमाचे फोटोग्राफर जे सुरेश यांनी एक छायाचित्र टिपलं आहे, त्या छायाचित्रात गेहलोतांच्या हातात एक चिठ्ठी दिसत असून ती चिठ्ठी सोनिया गांधींकडं सादर केल्याचं सांगितलं जात आहे.
गेहलोतांच्या हातात असलेली ती चिठ्ठी प्रतिस्पर्धी सचिन पायलटांविरुद्धचं आरोपपत्र असल्याचं फोटोवरून स्पष्ट दिसत आहे. सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदापासून रोखण्यासाठी अशोक गेहलोत दिल्लीत आले होते, असं बोललं जात आहे.
सोनिया गांधींसोबतच्या भेटीत गेहलोत यांनी पायलटांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सपा + 18 विरुद्ध 102 आमदारांचा पाठिंबा, असं सूचित करतं की पायलट काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. पायलट यांनी राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपसोबत कट रचल्याचा आरोपही गेहलोत यांनी केला आहे. यासाठी आमदारांना 10-50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचं सांगण्यात येतंय.
0 टिप्पण्या