मा.आ. नंदकुमार झावरे यांच्याकडून झाला सत्कार..
पारनेर : राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा, ता. पारनेर, जि.अहमदनगर या राज्यस्तरीय "ब" वर्ग तीर्थक्षेत्र देवस्थान ट्रस्टवर विश्वस्त म्हणुन देवस्थानचे ॲड. पांडुरंग गायकवाड यांची फेर निवड सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडून करण्यात आली आहे. त्याबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते मा. आ. नंदकुमार झावरे यांनी ॲड. पांडुरंग गायकवाड यांचा सत्कार केला आहे. मा. श्री नंदकुमार झावरे पारनेरचे आमदार असताना सन १९९०-९१ मध्ये ॲड. पांडुरंग गायकवाड यांनी श्री कोरठण खंडोबा देवस्थानचा जीर्णोद्धार आणि सेवा कार्याला सुरुवात केली होती. तेव्हापासून ३२ वर्षात देवस्थानचा झालेला विकास आणि ॲड. पांडुरंग गायकवाड यांचे देवस्थानचे सेवा कार्याबाबत श्री नंदकुमार झावरे यांनी मनोमन समाधान व्यक्त केले. ॲड. पांडुरंग गायकवाड यांनी श्री नंदकुमार झावरे यांचे आशीर्वादही घेतले..
0 टिप्पण्या