मविआच्या काळात अडगळीत गेलेल्या अधिकाऱ्यांचे सत्तांतरानंतर पुनर्वसन. महाविकास आघाडीच्या सत्तांतरानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकारने चार्ज घेताच सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी कंबर कसली आहे. त्यापैकीच एक मोठी बदलीची खांदेपालट नुकतीच पार पडली. गेल्या अनेक दिवसांपासून चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणार्‍या काही सनदी अधिकाऱ्यांचेही या सत्तांतराच्या गंगेत आपल घोड न्हाऊन निघाले आहे.

दिपक कपूर यामध्ये अपवाद नाहीत. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या दिपक कपूरांना आपल्या प्रदीर्घ प्रतिक्षेचे अतिशय उत्तम फळ लाभले आहे.  त्यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात जनसंपर्क संचलनानयाचा अतिरिक्‍त कार्यभारही त्यांच्याकडे होता.सनदी अधिकाऱ्यांच्या नेमणुकांमध्येही दोन्हीही अडगळीच्या पोस्टिंगचा वनवास कपूर यांच्या नशीबी महाविकास आघाडीच्या काळात आला खरा पण फडणवीसांच्या पुन्हा येण्याची वाट पाहणारे कपूर योग्य संधीच्या प्रतिक्षेत होते.

अखेर नव्या सरकारने केलेल्या ४४ अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये दीपक कपूर यांचीही वर्णी लागलीच.तुलनेने अतिशय चांगली पोस्टिंग समजल्या जाणाऱ्या जलसिंचन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पोस्टिंग मिळाली आहे. अर्थात फडणवीसांच्या मर्जीत असलेल्या परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात साईड किंवा कमी महत्वाच्या विभागात पोस्टिंग मिळालेले दीपक कपूर हे एकमेव अधिकारी नाहीत.ही यादी बरीच मोठी आहे. 

अद्यापही आणखी बरीच मोठी खांदेपालट येत्या दिवसात अपेक्षित आहे. सनदी अधिकाऱ्यांच्या नेमणुकांसोबतच मर्जीतल्या ओएसडीचे कमबॕक यानिमित्ताने आवर्जुन नमुद करावेसे वाटते.  नुकत्याच अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यक्रमासाठी परदेश दौऱ्यावर नार्वेकर, फडणवीसांच्या सोबतच विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे दिसले. यानिमित्ताने धवसेंचेही पुनर्वसन झाले हे वेगळं सांगायला नकोच. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या