निकाह प्रकरणी मुल्ला कटर कुरेशीसह ६ जणांना मोक्का !


श्रीरामपूर :
  शहरात घडलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण धर्मातर बेकायदा निकाह व सामुहिक बलत्कार! मुलीची विक्री ! वेशा व्यवसाय या अतिशय गंभीर अशा गुन्ह्यातील प्रमुख आरोपी इम्रान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर याच्या सह ६ जणांवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक बी जे शेखर पाटील यांनी तसे आदेश बजावले आहेत . एसपी मनोज पाटील ,अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष डीवायएसपी संदिप मिटके यांनी या प्रकरणी सखोल तपास करून संघटीत गुन्हेगारी मोक्का कायद्या अंतर्गत प्रस्ताव केला होता.त्याला आयजी बी.जे.शेखर पाटील यांनी मंजुरी दिली . 

सामाजीक दृष्टया अतिशय गंभीर व संवेदनशील अशा धर्मातर अपहरण बेकायदा निकाह व सामुहिक बलात्कार अशा अतिशय गंभीर गुन्ह्याची दखल विधीमंडळात गृहमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती ! व सखोल चौकशी चे आदेश दिले होते . त्यावरून डीवायएसपी संदिप मिटके यांनी आता पर्यंत ६ आरोपींना अटक केली होती. धक्कादायक बाब म्हणजे धर्मातर बलात्कार निकाह व सामुहिक बलात्कार व वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलीची विक्री हे भयंकर वास्तव समोर आले.

 प्रमुख आरोपी इम्रान युसुफ कुरेशी ऊर्फ मुल्ला कटर,रा-वार्ड न २, श्रीरामपूर याच्यासह गुन्हे दाखल आहेत. आरोपीचे नाव-

1) इमरान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर.

2) पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे        

3) सुमन मधुकर पगारे 4) सचिन मधुकर पगारे 5) बाबासाहेब एकनाथ चेंडवाल  

6)मिनाबाई रूपचंद मुसावत या सहा जणांवर मोक्का कायद्यार्तंगत कारवाई पोलीसांनी केली.

या धड़क व गुन्हेगारांना जरब बसविणाऱ्या कारवाईचे जनतेतून स्वागत होत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या सर्व आरोपींवर मिळुन तब्बल ५० गुन्हे दाखल आहे.पोलीसही गुन्ह्याची माहीती पाहून चक्राऊन गेले ! पोलीसांनी खोलवर तपास केल्याने या गुन्हेगारांची काळी कृत्ये जनते समोर आली.आता मोक्का लागल्याने आरोपींना जामीन मिळणे अवघड झाले आहे.

  भाजपाचे आमदार निलेश राणे यांनी श्रीरामपुरात या प्रकरणी मोर्चा काढला होता. या आरोपींना इतके दिवस कोण मदत करत होते याचा तपास सुरु आहे .लव जिहाद प्रकरणाने याची राज्यासह देशभर चर्चा झाली होती.

 सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.B.G. शेखर पाटील सो ,मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अप्पर अधीक्षक मा.स्वाती भोर,यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके ,PI गवळी, API बोरसे, psi सुरवडे, Lpn अश्विनी पवार,PN संतोष दरेकर,Pc,रवींद्र माळी,विलास उकिरडे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या