निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला 'ढाल-तलवार' असं चिन्ह! एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया.

 



मुंबई - आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबान हे चिन्ह गोठवलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला चिन्ह आणि नावांचे वाटप केले आहे. त्यानुसार आज शिंदे गटाला ढाल-तलवार हे पक्षचिन्ह मिळालं आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आमची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आहे. मराठमोळं चिन्ह आहे. आता पर्फेक्ट काम झालं. छत्रपती शिवाजी महाराजांची निशाणी आहे. ती महाराष्ट्रभर पोहोचली आहे. आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे. सर्वसामान्यांची शिवसेना आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

शिंदे गटाला काय चिन्ह मिळणार याची कालपासून उत्सुकता होती. दोन तलावर आणि एक ढाल असं हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे. मुळात शिंदे गटाने तळपता सूर्य हे चिन्ह पहिल्या पसंतीचं सांगितलं होतं. मात्र उगवता सूर्य आणि तळपता सूर्य यात गोंधळ होण्याची शक्यता होती.

उगवता सूर्य हे डीएमके पक्षाच चिन्ह आहे. तर तळपता सूर्य हे मिझोरम पार्टीला देण्यात आलेलं आहे. दरम्यान ढाल-तलवार हे चिन्ह पिपल्स डेमोक्रेटीक मुव्हमेंटला देण्यात आलेलं होतं. मात्र या पक्षाची नोंदणी २००४ मध्ये रदद् करण्यात आली होती. तेव्हापासून हे चिन्ह निवडणूक आयोगाच्या फ्री सिम्बॉलच्या यादीत होतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या