Breaking News

पत्रकार परिषदेवरून मनसे नेते संदीप देशपांडेंचा पवारांवर घणाघात.

 



अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहले होते. त्यानंतर शरद पवार यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली होती. राज ठाकरे यांचे आभार मानायला लागू नये यासाठी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली असल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

राज ठाकरे यांच्या पत्रामुळे भाजपने माघार घेतली असल्याचंही संदीप देशपांडे यांनी म्हंटलं आहे. पत्रकार परिषद घेत संदीप देशपांडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. अंधेरी निवडणूकीतून माघार घेण्यासाठी राज ठाकरे यांनी पत्र लिहाल या पत्रानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपने उमेदवारी मागे घेतल्यावर राज ठाकरे यांचे आभार मानायला लागू नये यासाठी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली अशी माहिती यांच्याकडे आहे असंही संदीप देशपांडे म्हणालेत.

स्व. रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लागली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून स्व. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. तर भाजपने मुरजी पटेल यांना मैदानात उतरवलं होतं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार देऊ नये, अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.


Post a Comment

0 Comments